तुळजापूर,  दि. १० :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून  धनगरवाडी ता.तुळजापूर  येथिल तांड्यावरील राहुल राठोड यांच्यासह  इतर युवकांचा मनसे  जिल्हा संघटक अमरराजे कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेत  जाहिर प्रवेश केला आहे. 

पक्षात पद,पैसा व निवडणूका डोळ्यासमोर न ठेवता मनसे पक्षाचे ध्येय धोरण अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे विचाराला बांधील राहून पक्षकार्य करण्याचे आवाहन जिल्हासंघटक अमरराजे कदम यांनी या पक्ष प्रवेश प्रसंगी आपल्या भाषणात व्यक्त केले.

यावेळी मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम,शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बबन वाघमारे ,जिल्हा सचिव दादा कांबळे,  माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र कोरेकर,
तालुका संघटक उमेश कांबळे,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे, नळदुर्गचे माजी शहराध्यक्ष शिवाजी सुरवसे, माजी तालुका संघटक अरूण जाधव, माजी शहराध्यक्ष विद्यार्थी सेना शिरीष डूकरे, यांच्यासह गावातील असंख्य युवक युवती,जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने हजर होते.

राज ठाकरे यांची रोखठोक आणि स्पष्ट भूमिका तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचे विचार हे लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊन अमर राजे कदम यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात पक्षाचे काम करू अशी प्रतिक्रिया राहुल राठोड यांनी दिली.
 
Top