काटी ,दि.७ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायतला दि.16 फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणारा तालुका व जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत महाराष्ट्र शासन विभागा अंतर्गत दिला जाणारा सन 2019-20 या वर्षाचा तालुका व जिल्हास्तरीय स्व.आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ.कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा तालुका व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा सुंदर गाव पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील "गुरुजी विचार मंचच्या व रुक्मिणी फाऊंडेशन " च्यावतीने रविवार दि.७ रोजी निलकंठेश्वर मंदिरासमोरील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच आदेश कोळी,उपसरपंच शामल हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम आगलावे यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रास्ताविकातून सहशिक्षक रविंद्र देशमुख यांनी सुंदर गाव पुरस्काराबद्दल ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सौ.शामल हंगरगेकर व सर्व ग्रा.पं.सदस्य,सर्व कर्मचारी यांचे गुरुजी विचार मंचच्या वतीने कौतुक केले. या सत्काराला उत्तर देताना सरपंच आदेश कोळी व ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे यांनी गुरुजी विचार मंचचे व रुक्मिणी फाऊंडेशनचे आभार व्यक्त करुन म्हणाले की, लोकसहभागातून चांगली कामे केल्यास सुंदर गाव करता येऊ शकत असल्याचे सांगत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागा अंतर्गत दिला जाणारा तालुका व जिल्हास्तरीय सुंदर गाव पुरस्कारासाठी जिल्हा निवड समितीच्या निर्धारित निकषांमध्ये काटी ग्रामपंचायतने सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने हा बहुमान काटी गावाला मिळाल्याचे सांगून गावाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल येथील गुरुजी विचार मंच व रुक्मिणी फाऊंडेशनने काटी ग्रामपंचायत टिमचा केलेल्या सत्काराने या पुढील काळात काम करण्याचे चांगले बळ मिळाल्याचे सांगून आणखी जोमाने काम करुन, पुरस्कार प्राप्त निधीतून व शासकीय विकास योजनांच्या निधीचा योग्य विकासाभिमुख विनियोग करुन राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी आम्ही लोकसहभागातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक पंकज काटकर यांनी तर आभार अनिल हंगरकर यांनी मानले
यावेळी सरपंच आदेश कोळी, उपसरपंच शामल हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे,माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम आगलावे,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, चेअरमन विक्रमसिंह देशमुख,प्रा.अभिमान हंगरकर, पत्रकार उमाजी गायकवाड, अनिल गुंड , रावसाहेब देशमुख, शामराव आगलावे, सुर्यभान हंगरकर,करीम बेग,प्रा.भारत गुरव,अशोक जाधव,अतुल सराफ,ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड, सुहास साळुंके, हेरार काझी, अनिल बनसोडे,अविनाश वाडकर,भैरी काळे,सतिश देशमुख,शिवलिंग घाणे, संजय महापुरे, संजोगता महापुरे, प्रज्ञा साळुंके, भामाबाई घाणे,,हाजीबेगम काझी,गुरुजी विचार मंचचे रविंद्र देशमुख, बाळासाहेब हंगरगेकर, दयानंद जवळगावकर,अनिल हंगरकर, सोमनाथ जामगावकर, पंकज काटकर, हर्षवर्धन माळी, बापु काळे, प्रशांत चव्हाण, भागवत गुरव, नागनाथ रोडे,वसंत चव्हाण, विलास देशपांडे, पंकज काटकर, जुबेर शेख, ग्रा.पं. कर्मचारी प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले विलास सपकाळ,अनिल बनसोडे, सविता बनसोडे, पोपट बोराडे आदीसह उपस्थित होते.