अणदूर,दि.८:
येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
प्रथमत: विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे सरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
विद्यालयातील महिला शिक्षिका श्रीमती अंधारे क्रांती ,कोरे मनिषा , कर्पे वैशाली , मैत्री पल्लवी , कासार वैशाली ,चौधरी ज्योती , घुगे कल्पना ,कस्तुरे सुरेखा , सेविका घुगे पदमीनबाई यांचा पुष्पगुच्छ व श्यामची आई पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
श्यामची आई पुस्तक साने गुरूजी कथामाला तुळजापूर तालूका कार्यकारिणी च्यावतीने भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व जागतिक महिला दिनाचे महत्व प्रदीप कदम यांनी सांगीतले.
यावेळी उपमुख्याध्यापक विनोद कदम , अनिल गुरव ,मकरंद पाटील ,लिंबाजी सुरवसे , अमित चौधरी, ठाकरू राठोड ,जयहिंद पवार ,उमेश चंदनशिवे आदीसह शिक्षक ,शिक्षकेत्तर सहकारी उपस्थित होते.