मुरूम, दि.७ :
येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक शामसुंदर मिणीयार यांच्या वहिनी तथा प्रतिष्ठित शेतकरी संजय शामसुंदर मिनीयार यांच्या पत्नी सुरेखा संजय मिणीयार यांचे रविवारी रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या ५२ वर्षाच्या होत्या. त्यांच्यावरती सायंकाळी ७ वाजता सार्वजनिक स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात्य पती, एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
प्रगतशील शेतकरी संजय शामसुंदर मिणीयार यांच्या त्या पत्नी होत.