किलज,दि.३०:
कुलस्वामीनी सूत गिरणीचे चेअरमन, उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवा नेतृत्व सुनील मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मधुशाली महाविद्यालय सलगरा (दि) ता.तुळजापूर यांच्या वतीने  वृक्षारोपण आणि ग्रामीण आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम सर्व नियमांचे पालन करीत  करण्यात आला.


यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. एन. स्वामी ,एस. गिरी , केसकर , भरगंडे , खुणे ,सुरवसे ,मुबिन ,प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.मुलानी ,आरोग्य सेवक शिंदे, हरीश पटेल,पारवे ,भोसले ,मनशेट्टी , महेबूब पठाण आदी उपस्थित होते. यंदा हा वाढदिवस  साध्या पध्दतीने आणि सामाजिक उपक्रम करून साजरा करण्यात आला.
 
Top