नळदुर्ग, दि. 30:
कुलस्वामिनी सुतगिरणीचे चेअरमन, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुनिल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे आयोजित रक्तदान शिबीरात 41 दात्यांनी रक्तदान केले.
नळदुर्ग शहरातील मल्लिकार्जुन सभागृहात मंगळवार दि. 30 मार्च रोजी युवा नेते सुनिल चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी सोलापूर येथील अश्विनी रूग्णालयाच्या रक्तपेढीच्यावतीने शिबीरात रक्त संकलन करण्यात आले.
या शिबीरात 41 दात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिबीराचे आयोजक नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी, शहबाज काझी, महालिंग स्वामी माजी नगरसेवक सुधीर हजारे, कल्पना गायकवाड, मल्लिनाथ माळगे, सचिन बेडगे, संदीप बेडगे, अजय बागडे, धनंजय डुकरे, विपुल जोशी, संकेत भुमकर, सुभाष कोरे, अजहर जाहागिरदर, अमर भाळे, पत्रकार सुहास येडगे, विलास येडगे, आदी उपस्थित होते.