उस्मानाबाद,दि.30
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवार दि.29 मार्च रोजी उस्मानाबाद शहरातील तेरणा पब्लिक स्कूल येथील कोरोनाशी संबंधित CCC केंद्रास भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद शहरातील भाजीपाला बाजारास भेट देऊन तेथे सामाजिक अंतर आणि मास्कच्या वापराबाबत पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.