वागदरी,दि.३०:एस.के.गायकवाड
वारकरी सांप्रदायिक्तेचा वारसा जोपासणारे गांव म्हणून ओळखले जाणाऱ्या वागदरी ता.तुळजापूर येथील ग्रामदैवत श्री संत भवानसिंग महाराज मंदिर यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय  यात्रा कमिटीने घेतला आहे.

  
 दरवर्षी होळी सणानंतर सातव्या दिवशी नाथषष्टीला वागदरी येथे श्री संत भवानसिंग महाराज यांची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून भरविली जाते. यात्रे निमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील चूंगी या गावातून श्री संत भवानसिंग महाराज यांची पालकी टाळकरी दिंडीसह आगमन होते.

 परिसरातील हजारो वारकरी भक्त येथे दर्शनासाठी येतात. अनेक ठिकाणाहून वारकरी दिंड्या येतात. एक मानवतेचा भक्तीमय मेळा येथे भरलेला दिसतो. भजन, किर्तन, भारूडे, प्रवचन, पुजाआर्चा ,आभिषेक व लाही फोडणे असे अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

 
 परंतु गत वर्षांपासून कोरोना विषाणूच्या महामारीमुळे प्रतिबंधक उपाय योजना म्हणून पुकारण्यात  आलेल्या संचारबंदीच्या नियमांचे पालन करत यावर्षी दि.३ मार्च २०२१ रोजी वागदरी येथे भरणारी श्री संत भवानसिंग महाराज मंदिर यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने आयोजित बैठकीत घेतला असून फक्त ठराविक भाविक मंदिरात जावून यत्रेच्या निमित्ताने धार्मिक विधी करणार आहेत. 


तरी भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मंदिराचे पुजारी सुरेशसिंग परिहार, ह.भ.प. राजकुमार पाटील, यात्रा कमिटीचे किसन पाटील भरतसिंग ठाकूर, राजकुमार पवार, रामचंद्र यादव आदीसह ग्रामस्थानी केले आहे.
 
Top