उस्मानाबाद , दि.3 :
उस्मानाबाद रोटरी क्लब हा विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असून सोमवारी रोटरी क्लबच्या 116 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लबचे सदस्यांनी पुढाकार घेऊन समाजातील गरजू व होतकरू दोन महिलांना रोटरीचे अध्यक्ष अमर देशमुख यांच्या हस्ते श्रीमती स्नेहप्रभा उल्हास सरवदे व श्रीमती संगिता सुनिल भास्कर यांना शिलाई मशीनचे वाटप केले.
महिला सबलीकरणाचे उल्लेखनीय कार्य केले. यासाठी रोटरी क्लबचे भुजंग शेट्टी , चित्रसेन राजेनिंबाळकर, सुमंत वेदालंकार, चंद्रसेन पिसाळ, सुरज कदम, राजेश कदम, गिरीष अस्टगी, चंदन भडंगे, रोहन घुटे ,अतुल मुळे, अमोल माने यांनी संयुक्तपणे आर्थिक मदत केली.
तेजस्विनी फाऊंडेशनच्या ॲड. तेजश्री पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अमर देशमुख, सचिव इंद्रजित आखाडे , नंदकुमार पिंपळे, सुधाकर भोसले, व इतर रोटेरियन मेंबर्स उपस्थित होते.