वागदरी , दि . ३ :
चिकुंद्रा ता.तुळजापूर येथील बाळु गायकवाड यांचे वडील सुदाम रकमाजी गायकवाड यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा अजाराने
निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलं, दोन मुली, सुना,जावाई नातवंडे असा परिवार आहे.
सुदाम गायकवाड हे महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग नळदुर्ग येथे पाटकरी म्हणून ३० वर्षे सेवा केली .
त्यांच्या पार्थिवावर चिकुंद्रा येथे बौद्ध धम्म पध्दतीने अंतिम संस्कार करण्यात आले.