नळदुर्ग ,दि.१ : 
नळदुर्ग महामार्ग  पोलिस  केंद्राच्यावतीने अणदुर ता.तुळजापूर  येथे हायवे मृत्युंजय दूत  योजनेचे उदघाटन करण्यात आले.


 अप्पर पोलीस महासंचालक  डॉ. भूषणकुमार उपाध्याय  यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक  संजय जाधव , पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर , पोलीस निरीक्षक  राजन सस्ते  महामार्ग पोलीस सोलापूर  विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली " हायवे मृत्युंजय दूत"  ही योजना राबवण्यात येत आहे, 

या योजनेचा उदघाटन कार्यक्रम महामार्ग पोलीस केंद्र नळदुर्ग  मार्फत  अणदूर येथे आयोजीत करण्यात आले होते.

 यावेळी डॉ. शेटे वैद्यकीय अधिकारी  यांनी अपघातग्रस्थांना मदत करण्याची प्रात्यक्षिके करून दाखवली, त्याचा वापर करून अपघातग्रस्थांना वेळेत मदत करा असेही आवाहन त्यांनी केले.

 प्रास्ताविकात प्रभारी अधिकारी हनुमंत कवले  यांनी   हायवे मृत्युंजय दूत योजनेबद्दल  माहिती देत अपघातग्रस्ताला  गोल्डन अवर्स मध्ये  वैद्यकीय मदत कशी मिळवून देता  येईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची सविस्तर माहिती  दिली. 

यावेळी महामार्गालगतच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच,उपसरपच आशा स्वयंसेविका तसेच महामार्ग  पोलिस केंद्र, हद्दीतील राष्ट्रीय, राज्य महामार्गालगत असलेल्या गावातील नव्याने तयार करण्यात आलेल्या मृत्युंजय देवदूत या ग्रुप मधील सदस्य, (NHAI चे कर्मचारी )  महामार्ग पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 


     हायवे मृत्यूजय दूत या योजनेत


 अपघात घडला त्या ठिकाणा पासून
अंबुलन्स  आसपास कुठे असते तसेच तात्काळ 108 क्रमकवर कॉल करून अंबुलन्स बोलावून घेणे,
जवळचे हॉस्पिटल कोणते आहे जिथे सर्व सुविधा असतील  ते अपघातग्रस्तना  सांगणे, 
जखमींना कसे उचलावे काय करावे काई करू नये कसे हाताळावे  प्रथो पंचार कसा करावा याचे  2 तासाचे प्रशिक्षण दिले जाईल या बद्दल माहिती दिली,
अपघात ग्रस्तांना , त्याच्या नातेवाईकांना स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात योजना तुन कोणत्याही दवाखान्यात  72 तास उपचार मोफत भेटतो  , जखमींना मदत केली,हॉस्पिटलला नेले तर पोलीस जास्त चौकशी करणार नाहीत पोलीस ,कोर्ट चा ससेमिरा मागे लागणार नाही,
,डॉक्टर जास्त प्रश्न विचारणार नाहीत मदत करणारांना कुठलाही प्रश्न न विचारता तात्काळ उपचार सुरू करतील , जे अपघात ग्रस्तना मदत करतील त्यांना प्रशस्ती पत्र दिले जाईल, 
महामार्ग पोलिस कडून आपणाला ओळखपत्र दिले जाईल "हायवे
 मृत्यू जय दुत " पोलीस मित्र 
महामार्ग मंत्रालय भारत सरकार द्वारे अपघातग्रस्तांना  वारंवार मदत करणाऱयांना गुड अवॉर्ड दिला जातो.

 जमलेल्या सर्वांना अपघात ग्रस्त व्यक्तींना कसे उचलावे कसे हाताळावे याचे प्रात्यक्षिक डॉ .शेटे- वैद्यकीय अधिकारी यांनी दाखवले व समजावून सांगितले.      
            
 
Top