नळदुर्ग ,दि.२ : सुहास येडगे
नळदुर्ग  येथील नगरपालिकेच्या वतीने सुमारे पावणे दोन कोटी रुपयेची विविध विकास कामे सुरु करण्यासाठी  अशोक जगदाळे यांच्या हस्ते सोमवार दि. १ मार्च रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

शहरातील एकूण १३ कामाचा  शुभारंभ करण्यात आला आहे. 
गेल्या दोन वर्षापासून शहरात विकास कामे झाली नाहीत अशी विरोधकांकडून ओरड सुरु होती. दरम्यान सध्याच्या नगराध्यक्षांच्या काळात शहरात कुठेच विकास कामे होत नसल्याच्या तक्रारी  वारंवार विरोधकांकडून होत होत्या. त्यामुळे अखेर ज्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत कामे चालू आहेत, ते नळदुर्गचे  अशोक जगदाळे यांच्या हस्ते पालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ सोमवारी   केला आहे. 
यावेळी जिल्हा नियोजन समीतीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, नगरसेवक महालिंग स्वामी, माजी नगरसेवक आमृत पूदाले, किशोर नळदुर्गकर ,  शब्बीर कुरेशी, ताजोददीन सय्यद, सामाजिक कार्यकर्ते संजय विठठल जाधव, नवल जाधव, अमीत शेंडगे, प्रविण चव्हाण, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे,  झहीर इनामदार आदींच्या उपस्थितीत  या कामांचा शुभारंभ करण्यात आला. 


यावेळी हुतात्मा स्मारका समोरील रस्ता, रहीम नगर येथील रस्ता, तम्मा बंदीछोडे घर ते रहीम नगर रस्ता, नारायण घोडके यांच्या घराशेजारी काँक्रीटकरण रस्ता, इंदिरा नगर येथे पेवर ब्लॉक बसविणे, साठे नगर येथे गटार बांधकाम व रस्ता कांक्रीटकरण, सावरकर चौक ते संभाजी चौक रस्ता डांबरीकरण करणे, भिमनगर येथे समाज मंदीर बांधकाम करणे, दुर्गा नगर ( वडार वस्ती ) येथे रस्ता काँक्रीटकरण करुन गटार बांधकाम करणे आदी कामासह इतर कांमाचा आदी कामाचा समावेश आहे. 


दरम्यान या सर्व कामांचा  शुभारंभ करुन सुमारे पावणे दोन कोटी रुपयेच्या कामाचा शुभारंभ अशोक जगदाळे व शिवाजीराव मोरे, शब्बीर कुरेशी, कमलाकर चव्हाण यांच्या हस्ते ठिक ठिकाणी श्रीफळ वाढवून करण्यात आला आहे.  शहरातील या कामाचा शुभारंभ झाल्याने आता शहरात पालिकेच्या वतीने इतर कांही रस्त्यांची कामे व गटार बांधकाम ही करण्यात यावे अशी अपेक्षा आता नागरीकांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान या कामाचा शुभारंभ करीत असताना एकाही ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगर अभियंता उपस्थित  नव्हते, त्यामुळे कोणते काम किती लाखाचे आहे किंवा या कामाचे अंदाज पत्रक कसे आहे यांची माहीती सांगणारा पालिकेचा एक ही कर्मचारी उपस्थित  नव्हता. त्यामुळे उपस्थितांतून अश्चर्य व्यक्त केले जात होते.
 
Top