तुळजापूर, दि.१ :
समाज कल्याण विभागातील वरिष्ठ लिपीक चंद्रकांत देवीदास भांजी यांचा सेवानिवृत्ती निमित्त भांजी परीवाराचा वतीने सपत्निक सत्कार करण्यात आला.
भारतीय नेव्ही मध्ये १६ वर्षांचा सेवे नंतर चंद्रकांत भांजी यांनी समाज कल्याण विभागातील १० वर्षाचा सेवा यशस्वी पणे पूर्ण करून नियत वयोमाना नुसार निवृत्त झाले.
यावेळी भांजी परीवाराच्या वतीने सपत्निक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक नागनाथ भांजी, सतीश भांजी, राजाभाऊ भांजी, नागेश भांजी आदीसह परीवारातील महिला, मुले, मुली उपस्थित होते.