वागदरी, दि.१ :

संत शिरोमणी गुरू रविदास यांच्या संकल्पनेतील सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी विषमतावादी  समाज व्यवस्थेचे परिवर्तन होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन  मुख्याध्यापक आर.एस.जोगदंड  यांनी दहीटणा ता.तुळजापूर येथे बोलताना केले.


  संत शिरोमणी गुरू रविदास यांच्या ६४४ व्या जयंती निमित्त दहीटणा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आर.एस.जोगदंड प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी डॉ. महंताप्पा कांबळे  तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय शिंदे,युवा प्रदेश अध्यक्ष ,नितीन  शेरखाने,जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष भैरवनाथ कानडे, परिवर्तन संस्थेचे  मारुती बनसोडे ,रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड आदी होते.


प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गुरू रविदास, छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून आभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैरवनाथ कानडे  तर सुत्र संचलन भैरवनाथ आहीरे यांनी केले.


  याप्रसंगी उपसरपंच सोमनाथ गुड्डे, ग्रामपंचायत   सदस्य श्रीकांत पाटील, बसवराज पाटील, उमाकांत कदम, बलभीम कदम,सुनिल कदम, बलभिमढ गुड्डे, शंकर कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव कमिटीचे गोविंद कांदवे,लक्ष्मण बनसोडे, सौदागर अय्यारे ,प्रा.सुहास कांबळे, सुरेश कांबळे, भैरवनाथ आय्यरे,लक्ष्मण कांबळे आदीनी पुढाकार घेतले.
 
Top