तुळजापूर, दि १२: डॉ सतीश महामुनी
कर्तृत्ववान महिलांचा सत्कार हा आरळी गावचा लक्षवेधी सोहळा आहे. या कार्यक्रमामुळे आरळी गावाचा लौकिक राज्यभर पसरला आहे असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ अस्मिता कांबळे यांनी काढले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्ताने तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार करण्यात आले. श्रीमती सुषमा शंकरराव शहाणे (सामाजिक योगदान),शैलजा नरवडे (सेंद्रिय शेती प्रयोग),सौ.जिनत कोहिनुर सय्यद (आदर्श सरपंच), डॉ.चंचला बोडके (आरोग्य कोरोना योद्धा),वर्षा रविंद्र कुदळे (लघु उद्योजिका),कोमल सतिष गोरे (पोलीस कोरोना योद्धा), मंजुषा कमलाकर स्वामी (उपक्रमशील आदर्श शिक्षिका),कु.प्रियंका किरण हंगरगेकर (सुवर्णकन्या),सौ.ज्योती पारवे (विशेष गौरव),पल्लवी श्रीकांत सोनवणे (विशेष सत्कार) यांचा समारंभात सन्मान झाला
आरळी बु महोत्सव समिती व स्वामी नरेंद्रचार्य सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने मागील ५ वर्षापासून हे पुरस्कार दिले जातात, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जि. प. सदस्य महेंद्र धुरगुडे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, सरपंच गोविंद पारवे, ग्रा.पं. सदस्य संजय पाटील,भीमराव सोनवणे, चेअरमन अनिल जाधव, मराठवाडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर, क्रीडा प्रशिक्षक संजय नागरे, शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष कोहिनूर सय्यद, पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. सतीश महामुनी, संघटक संजय गायकवाड, समाजसेवक पंकज शहाणे, परमेश्वर आगलावे आदीं उपस्थित होते.
यावेळी बोलताना जि. प.अध्यक्षा अस्मिता कांबळे म्हणाल्या की, उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान करण्यात येतो, पण आरळी बु येथील हा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे, प्रतिवर्षी जिल्हयात विविध क्षेत्रात आपले विशेष योगदान देणाऱ्यां कर्तृत्ववान महिलांची निवड करून त्यांना एकच व्यासपीठ उपलब्ध करून देत केलेल्या कार्य व्यक्त होण्याची संधी देतात. त्यामुळे या उपक्रमाची सर्वत्र चर्चा असते.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये खूप गुणवत्ता असते, अनेक आव्हाने पेलत त्या यशस्वी होत असतात. त्यामुळेच त्यांचे कार्य दिशादर्शक अन विशेष असे बनते असे म्हणाल्या. यावेळी महेंद्र धुरगुडे यांच्यासह सन्मानित हिरकणी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी आरळी बु. महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पारवे, उपाध्यक्ष धैर्यशील नारायणकर, सचिव भिमराव पारवे, मार्गदर्शक संजय पारवे, एकनाथ कोळी, सुधाकर पौळ, पांडुरंग कोळी, नेताजी सोनवणे,सम्राट पारवे आदींनी पुढाकार घेतले.