नळदुर्ग,दि.२७ : 
 शहरातील अलियाबाद येथील हिंदू स्मशानभूमीत लाईटची सोय करावी या मागणीचे निवेदन नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग शहरातील एखादी व्यक्ती मरण पावली तर त्यांच्यावर अलियाबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येते, कदाचित ही वेळ सायंकाळी 6 च्या नंतरची असेल तर स्मशानभूमीत लाईट नसल्याने अंधार पडतो. गेल्या अनेक महिन्यापासून येथील स्मशानभूमीत लाईटची सोय नसल्याने नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 त्यामुळे येत्या 8 दिवसाच्या आत नागरिकांची ही समस्या दूर करावी तसेच नळदुर्ग शहरातील लिंगायत समाज, चर्मकार, हिंदू खाटीक समाज स्मशानभूमी, मुस्लिम समाज स्मशानभूमी आदी ठिकाणी  लाईट नाही किंवा वीज खंडीत झालेली आहे अशा प्रत्येक ठिकाणची लाईट सुरळीत करावी अशी मागणी करण्यात आली.
 या मागणीवर मुख्याधिकारी  राठोड यांनी तात्काळ दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लाईट पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून अलियाबाद स्मशानभूमीत नवीन एलईडी बल्बचे लॅम्प बसवावे असे आदेश दिले. निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख, कोषाध्यक्ष सागरसिंह हजारे यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top