तुळजापूर , दि.२७ :
बारा बलुतेदार , अल्पसंख्याक बहुजन कामगार संघाच्या वतीने विविध विषयाचे निवेदन नुकतेच  उस्मानाबाद जिल्हाधिकारी याना देण्यात आलेआहे.

  निवेदनात म्हटले आहे, की उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड १९ स्थिती पाहाता अल्प प्रादुर्भाव आहे. मात्र राजकीय अडमुठे धोरणामुळे हातावर पोट असलेल्या हाँटेल कामगार, कापड दुकान कामगार, आडत दुकान हमाल,रिक्षा चालक, बांधकाम मजूर याना कामावर जाता येत नाही, तसेच फूटपाथवर गटई काम, फ्रुट विक्री करता येत नाही, 
लहान मोठे व्यवसाय बंद ठेवल्याने संबंधीतांची उपासमार होताना दिसत आहे..गर्दी टाळण्यासाठी लग्न समारंभ साजरे होत नसल्याने बँण्ड - बँजो व्यवसायीकांचे,मंडप व्यवसायीक  आणि गावकुसातील बारा बलुतेदार यांचेवर उपासमारीचे कठीण प्रसंग उद्भवतात. 

लोककलावंत , कलाकार वृध्दानां यातना सहन कराव्या लागतात.

     
 हे होऊ नये करीता ह्या सर्वांना कोरोना मुळे होत असलेले लाँकडावून, संचारबंदी, जनता कर्फ्यु काळात अत्यल्प शेतकरी,शेतमजूर,यानां अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी माहे मानधन देण्यात यावे लोककलावंत , कलाकार वृध्दांचे मानधन वाढवून वेळेत वितरीत करावे, बँजो पार्टी,मंडप व्यावसायिक व गावकुसाबाहेरील बारा बलुतेदार याना शासनाकडून नियमीत मानधन मदत म्हणून देण्यात यावी ,विविध ठिकाणी काम करणारे मजूर,कामगार,
फुटपाथवरील लहान मोठे व्यावसायिक याना कोविड १९ बजेट तरतुदीमधून जीवनाश्यक वस्तुचे मोफत वाटप करण्यात यावे,आदी विषय नमुद केले आहेत. 

निवेदनाच्या प्रत  सर्व तहसील कार्यालयास दिल्या आहेत.निवेदनावर बारा बलुतेदार , अल्पसंख्याक कामगार संघ जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.
 
Top