नळदुर्ग,दि.२७:एस.के.गायकवाड
नळदुर्ग शहरातील मुख्य रस्त्यावरून , चौका चौकातून पोलीस दलाच्या वतीने" जातीय दंगा काबूची" रंगीत तालीम शनिवारी करण्यात आली.
होळी, धुलीवंदन,रंगपंचमी, शिवजयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कालावधीत सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून
जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन यांच्या आदेशानुसार नळदुर्ग पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या आधिपत्याखाली "जातीय दंगा काबूची" रंगीत तालीम नळदुर्ग व अणदूर येथे करण्यात आली.
यावेळी साहय्यक पोलिस निरीक्षक एम. एम.शहा, साहय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने यासह नळदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी, होमगार्ड, जिल्हा दंगल पथकातील पोलीस कर्मचारी सहभागी होते.