काटी,दि.२७:उमाजी गायकवाड कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपाय योजना केल्या जात आहेत. नागरीकांना वारंवार सूचनाही देण्यात येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी  पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या आदेशानुसार तामलवाडी पोलीस स्टेशन व सशस्त्र दंगा काबू पथक यांच्या संयुक्त विद्यमाने तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 27 रोजी सकाळी तामलवाडी, सुरतगाव, व सावरगाव येथे पोलिस दलाच्या वतीने गावातून पथसंचलन करण्यात आले.

 वाढत्या रुग्ण संख्येमुळे आगामी येऊ घातलेले सणावर सार्वजनिक ठिकाणी सण उत्सवावर शासनाने निर्बंध घातले असून यासंबंधी वाहनातून आगामी साजरे होणारे होळी, धुलिवंदन, आणि रंगपंचमी हे सण सार्वजनिक ठिकाणी साजरे न करण्याचे आवाहन करुन कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी  करण्यात आल्या. तसेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या पथसंचलनामध्ये एपीआय सचिन पंडित, पीएसआय घुले यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचारी, उस्मानाबाद येथील सशस्त्र दंगा काबू पथकाने सहभाग नोंदवला होता.
 
Top