नळदुर्ग, दि. २७ 
 शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड शिल्ड लसीकरणाच्या दुस-या टप्यात  शनिवार दि. 27 मार्च रोजी
१८७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. 

यापूर्वी सोमवार रोजी १०७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले होते. नागरिकांचा कोरोना लसीकरणास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान पूढील लसीकरण शनिवार दि. 3 एप्रिल रोजी होणार असुन  सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव याच्यावतीने मोफत रिक्शा व रुग्णालयात पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली. 

  
  लसीकरणास सकाळी 10 वाजता सुरूवात करण्यात आली.  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. शनिवार रोजी लसीकरणाच्या मोहिमेत शहरांतील १८७ नागरीकांनी लसीकरण करून घेतले आहे. यावेळी लसीकरणासाठी नागरिकांची  गर्दी झाल्याचे दिसून आले. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यानी पिण्याच्या पाण्याची केली. 

  लसीकरणाच्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रास तुळजापूर तालुका वैद्यकीय आधिकारी पवार यांनी भेट दिली.  वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव,  डॉ. यशवंत नरवडे, डाँ शेख एम.एम. , परिचारीका सौ. सुमन फुले, एम.बी .जाधव, कुलकर्णी  पी.आर. ,जाधव व्ही .एच , आरोग्य सेविका सुरवसे रागिना, सोमनाथ जाधव , पवार सारिका यासह सर्व आरोग्य कर्मचा-यांनी  लसीकरण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. पूढील लसीकरण सोमवार रोजी होळी सणाची सुट्टी असल्याने शनिवार‍ दि. 3 एप्रिल रोजी  होणार  असल्याचे डॉ. राहुल जानराव यांनी सांगितले. 
     
सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांच्यावतीने शहरातील 60 वर्षापुढील नागरिकांना लसीकरणासाठी रुग्णालयात जाण्याकरिता मोफत ॲटो रिक्षाची सोय केली. याचा शुभारंभ डॉ. आंबेडकर इंग्लिश स्कुलचे संस्थापक मारूती खारवे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष कोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी संजय जाधव यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार मनसेचे ज्योतिबा येडगे, विशाल डुकरे,  महेंद्र डुकरे, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, अमर भाळे, उत्तम बनसगोळे, सुनिल गव्हाने,  नाभिक संघटनेचे राजेंद्र महाबोले, उमेश जाधव आदीजन उपस्थित होते.
 
Top