लोहारा,दि.२६: 
  केंद्रातील मोदी सरकारने अतिशय घाईगड़बडित कोणतीही चर्चा न करता पारित केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत, कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधड़ीला लागणार आहेत. तसेच पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढ, व महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांनी दि.२६ मार्च भारत बंद  पुकारला होता. 

या भारत बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिल्याने  लोहारा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोहारा तहसिल कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॕड. दिपक जवळगे, लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, शहराध्यक्ष के.डी. पाटील, लोहारा पंचायत समिती सभापती हेमलता रणखांब, उपसभापती व्यंकट कोरे, नागन्ना वकील, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, कानेगावचे माजी उपसरपंच नितीन पाटील, दिपक मुळे, नगरसेवक आरिफ खानापुरे, दिपक रोडगे, शंकर पाटील, उद्धव रणखांब, इस्माईल मुल्ला, चंद्रकांत फावडे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top