तुळजापूर, दि. २६ :
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुळजापूर च्यावतीने केंद्र सरकारने बहूमताच्या जोरावर अन्यायकारक शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी तुळजापूर शहर काँग्रेसच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार सौदागर तांदळे यांना शिष्टमंडळाने दिले.
यावेळी तालुका अध्यक्ष अमर मगर, माजी पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड , कुलस्वामिनी सह.सुतगिरणीचे संचालक विलास सरडे, नळदुर्ग शहराध्यक्ष नवाज काझी , नगरसेवक रणजीत इंगळे, सुनील रोचकरी, नगरसेवक विनायक अहंकारी, सेवादलाचे तालुका अध्यक्ष तानाजी जाधव, तुळजापूर विधानसभा मतदार संघ निरीक्षक विकास तांबे, यूवक काँग्रेस शहर अध्यक्ष लखन पेंदे, आण्णासाहेब मगर, चंद्रकांत लबडे, बाळासाहेब कदम, सुरेशं कोकरे, हरिश जाधव, हरी मचाले, मेटे महाराज, संजय साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ शेतकरी मागण्याचा अनेक महिन्यापासून विचार करत नसल्याचे चित्र असून हे खूप चिंताजनक आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याची भूमिका समजून घेतली पाहिजे, अशी भूमिका या निमित्ताने तालुकाध्यक्ष अमर मगर यांनी उपस्थित केली.