तुळजापूर, दि. १२ :
तुळजापूर येथे संस्कारभारतीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या रांगोळी विभागाच्या सहप्रमुख सौ अश्विनी अनंतराव कोंडो यांनी ओजस अभिजित कोंडो याच्या तिसऱ्या वाढदिवसा निमित्ताने बाल गोपाळांच्या उपस्थित मधुराष्टकाचे पठण करून शुभेच्छा दिल्या.
छोटेखानी खूप मनमोहक पद्धतीने कोंडो यांच्या निवासस्थानी हा शुभेच्छा सोहळा संपन्न झाला.
संस्कार भारतीच्या रांगोळी प्रमुख सौ अश्विनी कोंडो या दररोज दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये छोट्या बालगोपाळांना निशुल्क भगवतीचे शिक्षण देतात. त्यामध्ये या विद्यार्थ्यांनी १२, १३,१४ आणि १५ व्या आध्यायाचे पठण पूर्ण केले आहे. या दरम्यान त्यांचे नातू ओजस यांचा शुक्रवार रोजी वाढदिवस असल्या कारणाने मित्रांनी ओजसला शुभेच्छा देण्यासाठी मधुराष्टक याचे पठण केले आणि आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या. या छोट्या मुलांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार कुमार ओजस अभिजित कोंडो यांनी दुबई येथून ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले.
ओजस याचा हा तिसरा वाढदिवस असून तो दुबई येथे आपल्या आई-वडिलांसोबत वाढदिवस साजरा करीत असताना छोट्या मित्रांनी दिलेल्या शुभेच्छा मुळे कोंडो परिवाराचा आनंद द्विगुणीत झाला.