तुळजापूर, दि. २८ :
तुळजापूर शहरातील भालचंद्र (नाना) हरिश्चंद्र कदम यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन ( वय ६८ ) झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, सून, असा परिवार आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वार समोर असणाऱ्या हॉटेल समाधान या त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी प्रदीर्घकाळ व्यवसाय केला. मागील सहा सात वर्षांपासून त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली होती व कुटुंबासोबत त्यांनी राहण्याचा निर्णय निवृत्तीच्या निमित्ताने घेतला होता.
वैचारिक बैठक असणारा व्यापारी तसेच भाविक भक्तांना हॉटेल व्यवसायामध्ये समाधान देण्यासाठी सदैव धडपड करणारा मालक अशी त्यांची ओळख होती.