तुळजापूर, दि. १३ :
येथिल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये सामाजिक शास्त्र व वांड:मय मंडळाचे उद्घाटनाच्या निमित्ताने बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांनी उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कला विभागाच्या वतीने सामाजिक शास्त्राच्या अभ्यास मंडळाच्या भित्तीपत्रकाचे उदघाटन उल्हास बोरगावकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन बाबरे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव,तसेच मंडळाचे समन्वयक प्रा.मुळे प्रमोद, सदस्य डॉ. बिराजदार ए. एन., डॉ. देशमुख एम. जी., डॉ. एस. एस. कदम, प्रा. सौ.कोरेकर एस.एस., प्रा कदम एन. एस., डॉ. पांडुरंग शिवशरण, डॉ.अशोक मरडे ,डॉ. विनय चौधरी, डॉ. वाघमारे बी. एन., प्रा.जाधव डी.जी., सिनेट सदस्य प्रा संभाजी भोसले, सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे, प्रा. जी. व्ही. पाटील, डॉ. शिवाजी जेटीथोर, डॉ. प्रवीण भाले, डॉ. मंदार गायकवाड, प्रा. आमोद जोशी, पांडुरंग नागणे आदी विद्यार्थी उपस्थित होते.