नळदुर्ग,दि.२५: विलास येडगे
कोविड १९ साठी देण्यात येणारी लस ही सुरक्षित असुन नळदुर्ग शहरांतील नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता किंवा मनात भीती न बाळगता मोठयाप्रमानात लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नळदुर्ग शहर भाजयुमोच्यावतीने करण्यात आले आहे. 

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठयाप्रमानात वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनापासुन नागरीकांचा बचाव व्हावा, यासाठी सरकारने संपुर्ण देशात लसीकरण सुरू केले आहे. मात्र या लसीकरणाच्या बाबतीत मोठयाप्रमाणात अफवा पसरविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या लसीसंदर्भात नागरीकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे.
 मात्र ही लस अतीशय सुरक्षित आहे. ही लस कोरोनाशी लढण्यासाठी अतीशय चांगली आहे. ही लस घेतल्यानंतर नागरीकांना कुठलाच त्रास होत नाही तसेच या लसीमुळे कुठलाच साईड इफेक्ट होत नाही त्यामुळे नागरीकांनी स्वतासह आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ही लस घेऊन हे लसीकरण यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्रमिक पोतदार यांनी केले आहे.

नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. याठिकाणी आठवड्यातील सोमवार आणि शनिवार या दोन दिवशी सकाळी ९ वाजल्यापासुन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली नागरीकांना लस दिली जात आहे. त्यामुळे शहरांतील ६० वर्षांवरील सर्व जेष्ठ नागरीक तसेच शुगर, बीपी यासारखे आजार असणाऱ्या ४५ वर्षापुढील सर्व नागरीकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ही लस घ्यावी असे आवाहन  पोतदार यांनी केले आहे.
 
Top