उस्मानाबाद, दि.२८ :  
गोडावुनच्या पाठीमागुन पञा उचकटुन अज्ञात चोरट्याने हरभरा बीज प्रक्रीयेच्या ‘जॅकी’ या वाणाची 32 पोती किंमत.अंदाजे  सव्वा लाख रुपयेचा चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे. 

ढोकी, ता. उस्मानाबाद येथील आर.के. गुदामाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 26 एप्रील रोजीच्या रात्री 01.00 ते 03.00 वा. चे दरम्यान उचकटून हरभरा बीज प्रक्रीयेच्या ‘जॅकी’ या वाणाची 32 पोती (किं.अं. 1,25,000 ₹) चोरुन नेली. यावरुन बीज प्रक्रीया केंद्र अभियंता- पंडीत विश्वनाथ जाधवा यांनी दि. 27 एप्रील रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
Top