कळंब, दि.२८ :   
एका तरूणाने रात्रीच्या वेळी भिंतीवरून उडी मारून घरात घुसून मोबाईल व रोख रक्कम 60 हजार रूपये चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दिल्यावरून  एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना दि. 27 एप्रिल रोजी पहाटेपूर्वी कोठाळवाडी ता. कळंब येथे घडली आहे. 


 परमेश्वर वसंत कोठावळे, रा. कोठाळवाडी, ता. कळंब हे दि. 26- 27 एप्रील रोजी रात्री 22.00 ते 00.30 वा. चे दरम्यान घरात झोपलेले असतांना गावातीलच राहुल नावाच्या तरुणाने त्यांच्या घराच्या भिंतीवरुन आत उडी मारुन घरातील भ्रमणध्वनी व खुंटीला अडकवलेल्या पिशवीतील रोख रक्कम 60,000  चोरुन नेली. अशा मजकुराच्या परमेश्वर कोठावळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
Top