ढोकी, दि.२८ :
अर्थिक व्यवहाराच्या कारणावरून बाप लेकांनी तिघांना दगड, काठीने मारून गंभीर जखमी करून जीवेमारण्याची धमकी दिल्याप्ररिणी ढोकी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जागजी तांडा, ता. उस्मानाबाद येथील उत्तम व पवन उत्तम राठोड या दोघा पिता- पुत्रांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 27 एप्रील रोजी 11 वा. सु. तांड्यातील- मनिषा सुर्यकांत राठोड यांसह केशव राठोड, रेश्मा राठोड या तीघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मनिषा राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.