नळदुर्ग ,दि.२८ : एस.के.गायकवाड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग  येथे डॉ. भरत मंगरुळे यांनी  मुलाच्या वाढदिवसानिमित्त   पत्रकार व  नळदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना सँनिटायझर व मास्कचे  वाटप केले.


 वाढदिवस म्हटलं की केक ,फटाक्यांची आतिषबाजी ,पार्टी , वगेरे कार्यक्रम केले जातात. माञ डॉ. मंगरूळे यांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या सर्व प्रकाराला फाटा देऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनाची अमलबजावणी करण्याच्या द्दष्टीने   पत्रकार व पोलीस कर्मचा-यांची  मुलगा भाग्यराज  यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत सँनिटायझर व मास्कचे वाटप केले. 

 याप्रसंगी  साहय्यक पोलिस निरीक्षक  जगदीश राऊत ,पत्रकार विलास येडगे, सचिन गायकवाड, लतिफा शेख, किशोर धुमाळ, दादासाहेब बनसोडे, भैरवनाथ कानडे, भगवंत सुरवसे, एस.के.गायकवाड,  मारूती बनसोडे,  धर्मराज देडे,आनंद पुदाले ,सचिन टेकाळे,आदी उपस्थित होते.
 
Top