उमरगा, दि. 24  :

कोरोना या विषाणूचा प्रसार उस्मानाबाद जिल्र्ह्रयात होत असल्याचे दिसून येत आहे. उमरगा विभागातील उमरगा व लोहारा तालुक्यातील पूढील गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्गबाबत अनेक व्यक्ती  पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सदरील विषाणूचा संसर्ग वाढू न देण्यासाठी त्यावर तातडीने नियंत्रण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या दृष्टीने उमरगा तालुक्यातील 24 गावांच्या सीमाबंदीचा आदेश इन्सीडंट कमांडर तथा उपविभागीय दंडाधिकारी विठ्ठल उदमले यांनी जारी केले आहे.  

   उमरगा तालुक्यातील नमूद ग्रामपंचायत हद्दीतील या भागातील सीमा बंद करण्यात येवून त्या भागात येण्यास व जाण्यास फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे तरतुदीनूसार निर्बंध घालण्यात येवून मनाई हुकुम आदेश लागू करण्यात येत आहे. सदरचा आदेश दि. 23 एप्रिल रोजी पासून ते दि. 7 मे या कालावधी पर्यंत लागू करण्यात आले आहे.





 
Top