तुळजापूर,दि.२० :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळे बंद आहेत. माञ भाविक मंगळवार व दुर्गा अष्टमी असल्याने भाविक देवीच्या दर्शनाच्या आशेने तुळजापूरात येत असल्याचे दिसुन येत आहे. परंतु श्री तुळजाभवानी मंदिर व संपूर्ण शहर कडकडीत बंद असल्याने पाण्यासाठी भाविकांना भटकंती करावी लागत असल्याची परिस्थिती पाहुन देवीचे पुजारी लखन शिंदे यांनी भाविकांसाठी राजे शहाजी महाद्वार येथे पाणपोईचे शुभारंभ केले.
भाविकासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून शिंदे यानी मदतीचा हात पुढे केला आहे. या कार्याचे तुळजापुर शहरात व भाविकांकडून कौतुक केले जात आहे.