जळकोट,दि.७: मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद ग्रामपंचायतने संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, दिल्लीच्या धर्तीवर संपूर्ण तांडा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण गाव स्वयंपूर्ण झाले आहे.


विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेली आलियाबाद ग्रामपंचायत शैक्षणिक ,सामाजिक व  राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे.

 आलियाबाद ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम पुरस्कार,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार,स्मार्ट व्हिलेज पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार असे विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 


सातत्याने ही ग्रामपंचायत शासनाच्या सर्व योजनेची माहिती घेऊन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व सर्व ग्रा.प.सदस्य , ग्रामसेवक प्रशांत भोसले, व इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामात अग्रेसर असते.त्यातच
आता देशाची राजधानी  दिल्लीच्या धरतीवर संपूर्ण गावातील प्रमुख चौकात, ग्रामपंचायत परिसर , वाचनालय, मंदिर , प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

यामुळे गावातील स्वच्छतेवर लक्ष, चोरीच्या घटना, असामाजिक तत्त्वावर अंकुश राहतो म्हणून एक नाविन्यपुर्ण अशी योजना राबविण्यात आली असल्याची माहिती सरपंच सौ.  ज्योतीका चव्हाण यांनी दिली. 

कदाचीत  उस्मानाबाद जिल्ह्यात
 ही पहिलीच ग्रामपंचायत असेल, जे संपूर्ण गावातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली.
 
Top