नळदुर्ग,दि. १९ : 
येथे  उपजिल्हारुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे, याठिकाणी  वैद्यकीय अधिकारी सुद्धा नियुक्त केले आहे, परंतु जिल्हा प्रशासन हे रुग्णालय सुरू करण्याचे धाडस का करीत नाही, असा सवाल करीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रुग्णालयासमोर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोस्टर वाँर केले आहे.

यात प्रशासनाला उद्देशून इमारत बोलत असल्याचे पोस्टर मनसेने दाखवले आहेत,(१)"मी इमारत बोलते...हो मी फक्त शोभेचीच वास्तू आहे,मला माफ करा, (२) कोरोना रुग्ण संख्या वाढू अथवा आपघात होवोत , माझा काहीच उपयोग नाही, कारण प्रशासन माझ्याकडे दुर्लक्ष करीत आहे. (३) मनसेनी केलेले प्रतीकात्मक उद्घाटनानंतर सुद्धा प्रशासनाला शरम वाटली नाही,
(४)माझ्यासाठी घटांनाद पण केला, पण कानावर हात ठेवलेल्या प्रशासनाला ते ऐकूच आले नाही, (५) मी इमारत म्हणून तयार आहे, परंतु  प्रशासन तयार आहे का? तुम्हाला आरोग्य सेवा द्यायला?, (६) आता किमान (तात्काळ) कोविड सेंटर म्हणून तरी तुम्हाला सेवा देऊ इच्छिते,पण प्रशासनाला इच्छा आहे का?

अशा प्रकारचे पोस्टर वाँर करून प्रशासनाला सवाल केला आहे, यापूर्वीही मनसेनी हे उपजिल्हारुग्णालय सुरु करण्यासाठी थेट  मुख्यमंत्री, आरोग्यमन्त्री, यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानंतर घटांनाद आंदोलन ही केल होतं, प्रशासनाने दि. २ ऑक्टोबर रोजी म.गांधी जयंती दिनी या रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचे घोषित केले होते.  ती घोषणा हवेतच विरल्यानंतर मनसेनी दि. ३ ऑक्टोबर रोजी प्रतीकात्मक उद्घाटन करून पुन्हा प्रशासनाचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु  अद्याप पर्यंत  हे रुग्णालय सुरु झाले नाही. हे रुग्णालय सुरु झाल्यास नळदुर्ग शहरासह परिसरातील जवळपास दीड लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. 

 प्रशासन या विषयाकड़े गांभिर्याने लक्ष  देत नाही, आता परत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तरी कोविड सेंटर सुरु करून आरोग्य सेवा सुरु करावी अशी मागणी असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे पोस्टर वाँर केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नळदूर्ग शहरासह परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मनसेच्या पदाधिका-यानी नियमाचे पालन करीत हे पोस्टर वाँर केले आहे. 

यावेळी जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, आवेज इनामदार, संदीप वैद्य, अमीर फुलारी आदी उपस्थित होते.
 
Top