काटी,दि.१९ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतिशील शेतकरी हनुमंत दत्तु ढगे वय (85) यांचे सोमवार दि.(19 ) रोजी सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतिशील शेतकरी सुनिल ढगे व पुणे येथील प्रसिद्ध भाजीपाला व्यवसायिक बळी ढगे यांचे ते वडिल होत. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी चार वाजता येथील बारव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आले.