उस्मानाबाद,दि.३०: जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बेदमुथा यांचे वयाच्या ६७ वर्षी हैद्राबाद येथे कोरोनाने निधन झाले.
आठवड्याभरापुर्वीच विजयकुमार यांचे जेष्ठ बंधू पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचे कोरोनाने निधन झाले होते.
दोन आठवड्यापुर्वी पत्रकार विजयकुमार बेदमुथा आणि त्यांचे बंधू मोतीचंद बेदमुथा यांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाल्याने दोघावर हैद्राबाद येथे उपचार सुरु होते.
मोतीचंद बेदमुथा यांचे २२ एप्रिल रोजी निधन झाले तर विजयकुमार बेदमुथा यांचे शुक्रवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी निधन झाले.
केवळ आठच दिवसात दोन पत्रकार बंधूंचे निधन झाल्याने उस्मानाबादेत हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिवंगत पत्रकार विजयकुमार बेदमुथा जवळपास तीन दशके लोकमत उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. दहा वर्षांपूर्वी लोकमतमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते विविध सामाजिक कार्यात अग्रेसर होते.