उस्मानाबाद, दि. 01 : उस्मानाबाद जिल्हयात आज गुरुवार दि. 29 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 783 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 18 जनाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 653 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37 हजार 448 इतकी झाली आहे. यातील 29 हजार 667 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 903 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 हजार 878 जणांवर उपचार सुरु आहेत.