नळदुर्ग, दि.२९ :
अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हाद्दीत पोलिस पथकाने दि. 28 एप्रील रोजी सराटी व मानेवाडी आशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले असता देशी दारुच्या बाटल्या जप्त करुन दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत आनंद भारत कोरे, रा. सराटी, ता. तुळजापूर हे फुलवाडी शिवारातील टोलनाक्याजवळील रशिका हॉटेलच्या मागे 180 मि.ली. देशी दारुच्या 16 बाटल्या (किं.अं. 832 ₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असतांना आढळले.
दुसऱ्या घटनेत सुनिल राजेंद्र पाटोळे, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर हे मानेवाडी शिवारातील स्वत:च्या पानटपरीत अवैध विक्रीच्या उद्देशाने 180 मि.ली. देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 468 ₹) बाळगलेले असतांना पोलिस पथकास आढळले.