शिराढोण, दि. २९ :
खुनाच्या गुन्हयातील फरार असलेल्या एका आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गुरूवार दि. २९ एप्रिल रोजी सापळा रचून खडकवाडी परिसरातून ताब्यात घेतले.
गु.र.क्र. 143/2020 भा.दं.सं. कलम- 302, 307, 325, 324 या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गुल्या विठ्ठल काळे उर्फ सोन्या, रा. खडकवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर याचा पोलीस एक वर्षांपासून शोध घेत होते. त्यास स्थानिक गुप्त शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने, पोलिस नाईक दिपक लाव्हरेपाटील, अमोल चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, आरसेवाड यांच्या पथकाने आज दि. 29 एप्रील रोजी शिताफीने व सापळारचून खडकवाडी परिसरातून ताब्यात घेउन पुढील कारवाईस्तव शिराढोण पोलिस ठाणेच्या ताब्यात दिले आहे.