भूम, दि. २९ :
दुधात भेसळ असल्याची माहिती मिळाल्यावरून अन्न सुरक्षा अधिकरी यांच्या पथकाने कारवाईसाठी गेले असता डेअरी मालकाने दुध ओतून दिले, पथकाने प्रयोग शाळेत तपासणीसाठी घेतलेल्या दुधाचा नमुना हिसकावून फेकून दिल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दुध डेअरी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिवर्डा ता. भूम येथील ‘जय भगवान दुध डेअरी’ या दुध संकलन केंद्रातील दुधात भेसळ असल्याच्या गोपनीय खबरेच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील या पथकासह दि. 28 एप्रील रोजी 08.30 वाजण्याच्या सुमारास नमूद दुध संकलन केंद्रात कारवाईकामी गेल्या असता दुध डेअरीचे मालक अर्जुन आजिनाथ मुंडे यांनी डेअरीमधील दुधाने भरलेले कॅन जमीनीवर ओतुन दिले. तसेच पथकाने प्रयोगशाळेत तपासणी साठी घेतलेल्या दुधाचा नमुनाही अर्जुन मुंडे यांनी हातातुन हिसकावुन घेवुन जमीनीवर ओतला.
अशा प्रकारे अर्जुन मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन पथकाच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण करुन पुरावा नष्ट केला. यावरुन रेणुका पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 201 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.