उस्मानाबाद,दि.२९ : 
रूई (ढोकी) ता. उस्मानाबाद येथे  गुरुवार दि, २९  एप्रिल रोजी तहसीलदार गणेश माळी, गट विकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे, विस्तार अधिकारी (आरोग्य)  मुळे यांनी भेट देऊन कोरोना संबंधी केलेल्या उपाययोजनाची माहिती घेवुन  कोरोना संबंधी प्रतिबंधात्मक   मार्गदर्शन केले.


 या अंतर्गत पुर्ण गावात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. तसेच शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, यांना प्रत्येकी 50 कुटुंब वाटप करून देऊन या कुटुंबाला रोज भेट देऊन त्यांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनरने तपासणी करून त्यांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. 
तसेच कोरोना पेशंट निघालेला भाग प्रतिबंधित करून तो परिसर सील केला आहे. या प्रमाणे कोरोना विषयी ग्रामपंचायतकडुन विविध  उपाय योजना केल्या आहेत. 

यावेळी सरपंच सौ. शीतल कांबळे, उपसरपंच दिपक घुटे, ग्रामसेवक श्रीमती दिपाली मोहिते, सदस्य अण्णासाहेब देटे, समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती भावना महाजन आदि  हजर होते.
 
Top