चिवरी,दि.०१:राजगुरु साखरे
 एरवी होळी, रंगपंचमी,म्हटले की काही दिवस आधीपासूनच बच्चे कंपनीच्या उत्साहाला उधाण येते. परंतु यावेळी रंगपंचमी सणावर कोरोनामुळे मर्यादा आल्याने  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले असून त्यामुळे रंगपंचमी सणावर विरजण पडणार आहे. 

गेल्या वर्षभरात कोरोनाच्या सावटाखाली सर्व सण, उत्सव साजरे करण्यात आले, होळी व रंगपंचमी हा वर्षाच्या शेवटी येणारा सण, या उत्सवाची सर्वांना ओढ लागलेली असते. तसेच सृष्टीला ही वसंत ऋतूची चाहूल लागलेली असते, अशा आनंदमयी वातावरणात येणारा हा सण यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आल्याने बच्चे कंपनीचा थोडा हिरमोड झाला आहे.

 सध्या जिल्ह्यात  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक  प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत, याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात 29 मार्च पासून लाॅकडाउन सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रंगोत्सव साजरा करण्यावर काही बंधने आले आहेत,  जिल्ह्यासह ग्रामीण भागातील बच्चे कंपनीही साध्या पद्धतीने रंगोत्सव साजरा करणार असल्याचे चिञ दिसून येत आहे, 
 
Top