तुळजापूर, दि. १ : डॉ. सतीश महामुनी

तुळजापुर  तालुक्यातील आरळी (बु) येथे एक वर्षापूर्वी घडलेल्या वाईट प्रसंगांमध्ये गणेश यादव यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर यादव कुटुंब अडचणीत सापडले. यास गावामधील निवृत्त सहाय्यक फौजदार संजय रमेश पारवे यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने यादव कुटुंबीयांना गोड बातमी दिली.

पोलीस दलामध्ये प्रदीर्घकाळ सेवा केल्यानंतर त्यांनी  निवृत्तीनंतर सकाळ तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे घालवण्याचा निर्णय घेतला नोकरी केल्यानंतर त्यांनी ही सामाजिक बांधिलकी गावामध्ये आल्यानंतर देखील अनेक उपक्रमांमधून व्यक्त केली. या अधिकाऱ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकही वाढदिवस साजरा केला नाही. परंतु वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्याने  मित्र परिवार  यानी त्यांना वाढदिवस साजरा करण्याचा आग्रह केला आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने  पारवे यांनी कै. गणेश यादव यांची ४ महिन्यांची मुलगी कु. गौरवी गणेश यादव हिचे पोस्ट कार्यालयात १ हजार दरवर्षी भरणारी सुकन्या समृद्धी बचत योजना सुरु केली पुढील सलग १५ वर्षे ही योजना सुरू राहणार आहे आणि त्याची रक्कम या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय पारवे हे भरणार आहेत.

कु गौरवीचे आजोबा गोविंद यादव यांच्यासोबत मित्रपरिवाराने पोस्टमास्तर नवनाथ टकले यांच्याकडे सदर खाते सुरू केले.  

 वाढदिवसाच्या निमित्ताने यादव परिवाराला सुखद अनुभव दिला. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने भलेमोठे हार सत्कार  आणि पोस्टरबाजी करण्याच्या या काळामध्ये सामाजिक भान राखणारे संजय पारवे यांच्यासारखे अधिकारी आजही समाजामध्ये असल्याचे या निमित्ताने समोर आले. 

या उपक्रमाबद्दल संजय पारवे यांचा मित्रपरिवार आणि त्यांचे इतर ठिकाणी राहणारे हितचिंतक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गावचे सरपंच गोविंद पारवे, उपसरपंच किरण व्हरकट,  चेअरमन अनिल जाधव, माजी सरपंच पापालाल सय्यद, बजरंग कोकाटे, प्रकाश पोळ, बाबासाहेब भोसले, सचिन व्हरकट,  ऋषिकेश उकरंडे, परमेश्वर भोसले, सुरेश पारवे, नरेंद्र पारवे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
 
Top