जळकोट,दि.१६ : 
जळकोट मतदार संघातील जिल्हा परिषद गटाची प्रभाग समितीची बैठक झुम ॲप द्वारे संपन्न झाली.

जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.या बैठकीत जळकोट, हंगरगा नळ, जळकोटवाडी नळ, मुर्टा, होर्टी,मानेवाडी,  हगलूर ,चिकुंद्रा , येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचा सहभाग होता.या बैठकीत सर्व ग्रामपंचायत अंतर्गत कोरोना प्रतिबंध समितीची बैठक नियमितपणे घेऊन कोरोना प्रतिबंध उपाययोजना करण्यात यावे. ग्रामपंचायत अंतर्गत चालू असलेल्या रमाई आवास, प्रधानमंत्री आवास, शबरी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना यांचा सविस्तर आढावा घेऊन लाभार्थीचे बिल वेळेत देण्याचे सुचना करण्यात आले.

तसेच दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना,जनसुविधा, नागरीसुविधा,जि.प.स्तर, पंचायत समिती स्तर, नवीन शाळा खोली, शाळा दुरुस्ती  हे सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात यावे, असे सांगण्यात आले.
बैठकीत विस्तार अधिकारी तांबोळी,  शाखा अभियंता ए. आर. खान  ,सरपंच अशोकराव पाटील, म‌हेश‌ कदम  ग्रामसेवक जी.के.पारे‌‌ उपस्थित होते.
 
Top