काटी,दि.१६ :उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समिती गणातील पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे यांनी शुक्रवार दि. 16 रोजी  तुळजापूर पंचायत समितीच्या झालेल्या मासिक बैठकीत  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ग्रामसमृध्दी योजनेच्या  माध्यमातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध बनविण्यासाठी असणाऱ्या योजना तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना  पंचायत समिती अंतर्गत कामांतून  सामुहिक व  वैयक्तिक पायाभूत लाभाच्या सुविधा उपलब्ध करून  देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. 

यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक लाभार्थ्यांना गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन निवारा शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे,भुसंजीवनी कंपोस्टींग खत खड्डा या वैयक्तिक कामाच्या लाभांच्या या मागण्या मांडण्यात आल्या. त्याच बरोबर सिंचन विहीर, तुती लागवड, शेततळे, बांधबंदीस्ती, नाफेड, गांडूळ खत कुकुट पालन शेड, फळबाग लागवड, बांधावरील फळबाग लागवड, विहीर पुनर्भरण, शोष खड्डे याही  मागण्या करण्यात आल्या. 


तसेच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन मागील वर्षी प्रमाणे स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात फवारणी करावी अशी मागणी करण्यात आली.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे यांनी केलेल्या मागणीचा विचार करून यासाठी कुशल व अकुशल बाबींचा समतोल राखून हि योजना राबविण्यात येईल
प्रशांतसिंह मरोड 
गटविकास अधिकारी पंचायत समिती,तुळजापूर
 
Top