तुळजापूर,दि.१७ 
 शहरातील  कुतवळ परीवाराच्या वतीने नवीन बसस्थानका समोर पाण्याचे हौद ठेवण्यात आले असून याद्वारे  उन्हाळ्यात मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय  झाली आहे. 


कुतवळ परीवाराच्या  उपक्रमाचे  सर्वञ कौतुक होत असून शहरात इतर ठिकाणी पाण्याचे हौद ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.  गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे शहरातील मोकाट जनावरांच्या पिण्याच्या  पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यासाठी श्रेयश कुतवळ यांनी  पुढाकार घेतला असून त्यांचे वडील कै. खंडेराव कुतवळ यांचा स्मरणार्थ नवीन बस स्टॅंड समोर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. या ठिकाणी पाण्याचे हौद ठेवण्यात आले असून दररोज कुपनलीकेचे पाणी सोडण्यात येणार असल्याचे श्रेयश कुतवळ यांनी सांगितले आहे. 

   याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, निरज साळुंके, सहदेव हुच्चे,  मूसाभाई शेख, प्रदीप डोंगरे आदींची उपस्थिती होती.  

 सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज 

  दरम्यान शहरातील इतर भागात ही जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून शहरातील नळदुर्ग रोड, उस्मानाबाद रोडवर पाण्याची सोय करण्याची गरज असून यासाठी इतर सामाजिक संघटना, नागरिकांनी पूढे येण्याची गरज  आहे. 
 
Top