"ये जनता है साहब... जनता सब जानती है"। 

कोरोनाचं संकट खरंच देशावर आहे ना? हा प्रश्न पडणं साहजिकच आहे, का??तर..एकीकडे कोरोनाचं संकट देशावर असताना, दुसरीकडे विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सभा होत आहेत, रॅली काढली जात आहे.सरकारच्या आदेशानुसार सामान्य नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळायचा सरकारी नियमांचं पालन करायचं!!मग शासनालाच त्यांनीच आखून दिलेल्या नियमांचं विसर पडत असेल तर,आपण त्या नियमांचं पालन करतोय का? या प्रश्नाचं आत्मपरीक्षण करण्याची गरज सरकारला आहे. 


पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये. हा नियम केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांनीच आखून दिला होता ना! मग त्या नियमाचं उल्लंघन सरकार कडून झालेलं दिसत आहे. सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली. पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये .हे सुद्धा सांगितलं,मात्र सरकारी दरबारचे कार्यक्रम मोठ्या थाटात आणि मोठ्या संख्येने पार पाडताना दिसत आहेत.मग सरकार म्हणेल आम्ही तर मास्क घालून कार्यक्रम पार पाडतोय! जर फक्त मास्क घालून कोरोना आटोक्यात येणार असेल तर..शाळा,कॉलेजेसमध्ये तर मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगच पालन होत होतं! तरी इथे मात्र कोरोना होण्याची भीती सरकारला होती.म्हणून शाळा कॉलेजेस बंद करण्यात आले. दहावी-बारावीच्या परीक्षेवर ज्या विद्यार्थ्यांचं पुढचं भविष्य अवलंबून असतं! त्यांच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन? यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे..का??तर पाच पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येतील त्यांना कोरोना होईल याची भीती सरकारला आहे. 


मग निवडून येण्यासाठी रॅली काढलेली सरकारला चालते..सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केलेलं चालतं...रॅलीमध्ये हजारो व्यक्ती एकत्र आलेलं सरकारला चालतं..इथे कोरोना होण्याची भीती सरकारला नाही.इथे परत एकदा देशावर कोरोना संकट आहे ना? हा प्रश्न  उपस्थित होतो. रॅली काढून आपण कुठल्या नियमाचं पालन करतोय? या प्रश्नाचं आत्मपरीक्षण सरकारने करायलाच हवं..छायाचित्रात असं जर चित्र दिसत असेल तर जनतेनी त्यांच्या नियमांचं पालन का करावं? हा प्रश्न उपस्थित होणे अपरिहार्य आहे. 

निवडणुका करायला अख्ख आयुष्य आहे, साहेब!!आधी कोरोनाला तर हरवू या ना! 
                     "असो मात्र आपण असं नं करता "जान है तो जहान है"। या म्हणीप्रमाणे वाटचाल करूया.. स्वतःचं स्वतःची काळजी घेऊ या ..वेळोवेळी हाताना सॅनिटायझर व तसेच सोशल डिस्टंसिंगचं पालन करून कोरोनाला हरवू या"!!                                                                    कु.राजनंदिनी मेघराज किलजे,
    एमजीएम पत्रकारिता व जनसंवाद  महाविद्यालय, औरंगाबाद.( प्रथम वर्ष)

 
Top