तुळजापूर , दि. २३: डॉ. सतीश महामुनी
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांना कोरोना लस देण्याची मागणी करुन पन्नास टक्के खर्च स्वता करणार असल्याचे काँग्रेस नगरसेवक सुनील रोचकरी यांनी जिल्हाधिकाऱ्याना लेखी अर्जाव्दारे कळविले आहे.
शासनाच्या वतीने १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तुळजापूर येथील प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक सुनील रोचकरी यांनी लसीकरण करण्यासाठी लागणारा ५० टक्के खर्च स्वतः करण्याची तयारी दाखवली आहे. अशा प्रकारची अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.कौस्तुभ दिवेगावकर यांना देण्यात आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण , युवक नेते सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा लोक कल्याणकारी उपक्रम हाती घेत असल्याचे पत्रात नमुद करुन नगरसेवक सुनील रोचकरी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तुळजापूर येथिल प्रभाग क्र.४ मधील अठरा वर्षाच्या वरील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेण्यास तयार आहे.
प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन त्यासाठी लागणारा ५० टक्के खर्च रोचकरी स्वतः करण्यास तयार आहेत. प्रभागांमधील लोकांना लसीकरण करण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या " माझे कुटुंब माझी जबाबदारी" या अभियानाअंतर्गत "माझा प्रभाग माझी जबाबदारी" अशीच जबाबदारी मी घेत आहे, सुनील चव्हाण विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून सदर उपक्रम राबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी, अशी विनंती नगरसेवक रोचकरी यांनी केली आहे.
कोरोना संसर्गजन्य परिस्थितील या पार्श्वभूमीवर एखाद्या नगरसेवकाने पुढाकार घेऊन लसीकरणाचा संपूर्ण प्रभागाचा कार्यक्रम राबवण्यासाठी माझा प्रभात माझी जबाबदारी अशी जबाबदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केल्यानंतर प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांनी आपल्या नगरसेवकाच्या कर्तव्यदक्षते बद्दल समाधान व्यक्त केले आहे.