तुळजापूर, दि.२७ :
 शहरातील  नळदुर्ग रस्त्यावर भरधाव ट्रकने रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर चढला. या आपघातात ट्रकचे नुकसान झाले असुन सुदैवाने जिवीत हानी झाले नाही. ही घटना मंगळवार  दि. २७ एप्रिल रोजी  तुळजापूर शहरात घडली.    

तुळजापुर शहरातुन  नळदुर्गकडे जाणा-या   राज्यमार्गावरील  महात्मा बसवेश्वर चौकातुन भरधाव  जात असलेला   ट्रक (क्रमांक के. ए. ३२ डी  ३७८२ ) चालकास 
 अंधारात दुभाजक न दिसल्याने तो ट्रक थेट दुभाजकावर चढला. या आपघातग्रस्त ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. 
सदरील ठिकाणी  दुभाजकावर  गेल्या आठवड्यात ही असाच अपघात झाला होता.  याठिकाणी दुभाजक ठळक दिसण्यासाठी  मोठे व रेडियम कलर करण्याची मागणी वाहन चालक व नागरिकातुन   होत आहे.
 
Top