वागदरी , दि.२७ :
कोरोना मुक्त गाव ठेवण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे ग्राम कोरोना पर्यवेक्षक घरोघरी जाऊन संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची नोंद, पहाणी रजिस्टरला घेऊन कोणाला काही सर्दी, खोकला, ताप असा त्रास आहे का ? याबाबत माहिती घेत आहेत.
सध्या सर्वञ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून दिवसेन दिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसुन येत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी यासह कडक निर्बंध लागु केले आहेत. दुसऱ्यांदा लाँकडाउन करण्याची वेळ आली आहे. लवकरात लवकर या गंभिर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावा गावात ग्राम कोरोना पर्यवेक्षकांची निवड करून कुटुंब सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून वागदरी ता.तुळजापूर येथिल जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जते व सर्व शिक्षक ' अंगणवाडी मदतनिस यांची ग्राम कोरोना पर्यवेक्षक म्हणून निवड करण्यात आली असून ग्राम पर्यवेक्षका एम.आर.चौधरीसह सर्व पर्यवेक्षक घरोघरी जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची अधार कार्ड नंबर नोंदणी करून कोरोना विषयी जाणीव जागृती करित आहेत.